! महाराष्ट्र गोसेवा आयोग आयोजित "ई गोकट्टा" मार्गदर्शन, माहिती, कार्यांची ओळख, भेटी, चर्चा, संवाद, मंथन, विचार, प्रेरणा, सल्ला, शिफारसी मुक्त संवादपीठ : दर महिन्याच्या १ तारखेला (नियमितपणे) वेळ : सायं. ०७:३० ते ०९:०० येथे क्लिक करून आपण आपला सहभाग नोंदवू शकता    ! गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळांमधील देशी गायींच्या पालनपोषणासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात प्रति दिन प्रती पशू रु. ५०/- अनुदान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करणेची मुदत दिनांक १५/०६/२०२५ ते ३०/०६/२०२५ पर्यन्त वाढविण्यात येत आहे.     ! दिवाळी साठी गोमय दिवे , गोमय लक्ष्मी मूर्ती, गोमय साबण, उटणे यांसारखी गोमय नैसर्गिक उत्पादने तयार करणाऱ्या नोंदणीकृत गोशाळा, खाजगी संस्था, कारखाने किंवा व्यक्तींनी त्यांची माहिती येथे क्लिक करून भरावी.

आमचे नेतृत्त्व

यशस्वी मार्गदर्शन करणारे मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सचिव महोदय, व व्यवस्थापकीय संचालक हे महाराष्ट्रातील गायींच्या आर्थिक प्रगतीसाठी अथक प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे ग्रामीण भागात गोपालन क्षेत्रात सशक्त बदल घडून येत आहेत.

अधिक माहिती

२२ जून – ०५ जुलै २०२६

राज्यमाता गोमाता
संवाद यात्रा

पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोग द्वारा आयोजित

📍
शुभारंभ
पुणे, ४:३० सायं.
🏁
समारोप
नागपूर, ०५ जुलै
🚩
आयोजक
श्री. शेखर मुंदडा
PDF Download
१५
📅
दिवस यात्रा
६०००
🗺️
किमी प्रवास
३५
📍
जिल्हे
१०००+
🏠
गोशाळा सहभाग
१५,०००
👥
संवाद सहभागी
१२०+
🏡
नव्या गोशाळांना मान्यता
यात्रेचे उद्देश

या यात्रेमागील उद्दिष्टे काय आहेत?

०१
🌾

गोधारित शेती

गोधारित शेतीचा प्रचार प्रसार करणे आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे.

०२
🏠

आत्मनिर्भर गोशाळा

महाराष्ट्रातील गोशाळा स्वावलंबी (आत्मनिर्भर) बनविण्यासाठी मार्गदर्शन.

०३
🧴

गोमय उत्पादने

गोबर-गोमूत्रापासून तयार होणाऱ्या गोमय मूल्यवर्धन उत्पादनांचा प्रसार.

०४
📢

योजनांचा प्रसार

पशुसंवर्धन विभाग व गोसेवा आयोगाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार.

०५
🤝

समन्वय बैठका

गोशाळा संचालक आढावा बैठक, पशुसंवर्धन विभाग व गोशाळा समन्वय.

०६
🛡️

गोरक्षक समन्वय

पोलिस प्रशासन व गोरक्षक यांच्यातील समन्वय साधणे व बळकट करणे.

०७
⚖️

हत्याबंदी कायदा

संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याचा प्रचार, प्रसार व कडक अंमलबजावणी.

०८
🐄

देशी गोवंश जनजागृती

देशी गोवंश पालन पोषण संदर्भात सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणे.

०९
💰

आर्थिक सशक्तीकरण

राज्यमाता-गोमाता धोरणांतर्गत गोशाळांचे शाश्वत आर्थिक केंद्रांमध्ये रूपांतर.

यात्रेची वैशिष्ट्ये

गो-रथयात्रेची विशेष वैशिष्ट्ये

१५ दिवस
गो-रथयात्रा कालावधी
६,००० किमी
गो-रथयात्रा प्रवास
३५ जिल्हे
महाराष्ट्रात संचालन

गेल्या ३ वर्षांतील उपलब्धी

🏡१२०+नव्या गोशाळांना मान्यता
🐄हजारोगोवंशाचे पुनर्वसन
🌿₹४५ कोटीचारा-छावण्यांचे नियोजन
📣यशस्वीजनजागृती मोहीम
🚌
रथ वाहनाचे संकल्पचित्र — विशेष सुसज्ज गो-रथ वाहन महाराष्ट्रभर संचार करेल. या रथावर गोसेवा आयोगाच्या योजना, उपलब्धी व माहिती प्रदर्शित केली जाईल. हे सर्व आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे.
यात्रा वेळापत्रक

दिनांकनिहाय ठिकाण व मार्ग — पुणे ते नागपूर

🟢
शुभारंभ
पुणे — २२ जून २०२६
पशुसंवर्धन आयुक्तालय, सायं. ४:३० वा.
🏁
समारोप
नागपूर — ०५ जुलै २०२६
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
अ.क्र.दिनांकसकाळचे सभेचे ठिकाणदुपारच्या सभेचे ठिकाण
२३ जून २०२६अहिल्यानगरछ.संभाजीनगर
२४ जून २०२६जळगावधुळे
२५ जून २०२६नाशिकठाणे
२६ जून २०२६रायगडसिंधुदुर्ग
२७ जून २०२६कोल्हापूरसोलापूर
२८ जून २०२६लातूरनांदेड
२९ जून २०२६परभणीबीड
३० जून २०२६जालणाबुलढाणा
०१ जुलै २०२६अकोलायवतमाळ
१००२ जुलै २०२६अमरावतीयवतमाळ
११०३ जुलै २०२६वर्धाचंद्रपूर
१२०४ जुलै २०२६गोंदियाभंडारा
🏁  ०५ जुलै २०२६ — समारोप : नागपूर
यात्रा मार्ग

राज्यमाता गोमाता संवाद यात्रा — मार्ग नकाशा

🟢
पुणे
शुभारंभ · २२ जून २०२६
📅
१५ दिवस
यात्रा कालावधी
🗺️
६,००० किमी
एकूण प्रवास
📍
३५ जिल्हे
संचालन
🏁
नागपूर
समारोप · ०५ जुलै २०२६
नकाशा मार्गदर्शिका
शुभारंभ (पुणे)
यात्रा थांबे
समारोप (नागपूर)
यात्रा मार्ग
राज्यमाता गोमाता संवाद यात्रा मार्ग नकाशा
यात्रा दिनदर्शिका
शुभारंभ
🟢 पुणे
२२ जून
दिवस १
अहिल्यानगर · छ.संभाजीनगर
२३ जून
दिवस २
जळगाव · धुळे
२४ जून
दिवस ३
नाशिक · ठाणे
२५ जून
दिवस ४
रायगड · सिंधुदुर्ग
२६ जून
दिवस ५
कोल्हापूर · सोलापूर
२७ जून
दिवस ६
लातूर · नांदेड
२८ जून
दिवस ७
परभणी · बीड
२९ जून
दिवस ८
जालणा · बुलढाणा
३० जून
दिवस ९
अकोला · यवतमाळ
०१ जुलै
दिवस १०
अमरावती · यवतमाळ
०२ जुलै
दिवस ११
वर्धा · चंद्रपूर
०३ जुलै
दिवस १२
गोंदिया · भंडारा
०४ जुलै
समारोप
🏁 नागपूर
०५ जुलै
🚌
रथ वाहन — विशेष सुसज्ज गो-रथ वाहन महाराष्ट्रभर ३५ जिल्ह्यांत संचार करेल. ६,००० किमी प्रवासात १,००० गोशाळा व १५,००० गोशाळा संचालक, गोरक्षक, गोपालक व शेतकरी यांच्याशी संवाद साधला जाईल.
आयोजन समिती

सन्माननीय मार्गदर्शक व आयोजन समिती सदस्य

श.मुं.
श्री. शेखर मुंदडा
अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) — महाराष्ट्र गोसेवा आयोग
मुख्य आयोजक

शासकीय सदस्य

कि.पा.
डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.)
मा. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य
रा.एन.
डॉ. रामास्वामी एन. (भा.प्र.से.)
मा. सचिव (पदुम) महाराष्ट्र राज्य
शा.पा.
डॉ. शामकांत पाटील
सहआयुक्त पशुसंवर्धन तथा सदस्यसचिव, म.गो. आ.

अशासकीय सदस्य

सु.सू.
डॉ. सुनील सूर्यवंशी
अशासकीय सदस्य, म.गो. आ.
सं.भो.
श्री. संजय भोसले
अशासकीय सदस्य, म.गो. आ.
म.व.
श्री. मनीष वर्मा
अशासकीय सदस्य, म.गो. आ.
स.गु.
श्री. सनतकुमार गुप्ता
अशासकीय सदस्य, म.गो. आ.
दी.भ.
श्री. दीपक भगत
अशासकीय सदस्य, म.गो. आ.
उ.ने.
श्री. उद्धव नेरकर
अशासकीय सदस्य, म.गो. आ.
नि.मा.
डॉ. नितीन मार्केंडेय
अशासकीय सदस्य, म.गो. आ.
प.श.
श्री. परेशभाई शहा
अशासकीय सदस्य, म.गो. आ.
🐄गौमातेचे संवर्धन — शेतकऱ्यांची प्रगती — राज्याची समृद्धी🐄

गोसंरक्षण — आपली सामूहिक जबाबदारी

गोसंगोपन, गोसंवर्धन आणि मुख्यत्वे गोसंरक्षण हे किती महत्वाचे आहे हे स्पष्टपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी राजभवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये सांगितले.

एवढेच नाही तर प्राकृतिक शेती या विषयांवर जी कार्यशाळा आदरणीय राज्यपाल देवव्रतजी यांनी मांडली त्यामध्ये देखील शेवटचे समाधान हे देशी गोवंशच आहे याची त्यांनी स्पष्टोक्ती केली. आपल्या सर्वांचे हे कर्तव्य आणि जबाबदारी आहे की देशी गोवंशाचे पालन, पोषण व संरक्षण हे झालेच पाहिजे आणि गोहत्या बंदी कायदा कडक पद्धतीने महाराष्ट्रात लागू झालेला आहे, त्याची अंमलबजावणी येणार्‍या काळात अधिक प्रभावीपणे करण्याचे महाराष्ट्र गोसेवा आयोगाने ठरविले आहे.

— महाराष्ट्र गोसेवा आयोग

❄️ तीव्र हिवाळ्यातील गोवंशाची घ्यावयाची काळजी

डिसेंबर व जानेवारी या महिन्यात गोवंशासाठी आवश्यक व्यवस्थापन, संरक्षण आणि आरोग्य उपाय

डिसेंबर आणि जानेवारी हे तीव्र हिवाळ्याचे महिने पूर्ण वाढ झालेल्या गोधनासाठी आरोग्य विकासाचे असले तरी वाढीची वासरे आणि वय झालेला गोवंश यासाठी प्रतिकूल ठरतात. त्यामुळे योग्य नियोजन व व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते.

  • 1. थंडीपासून संरक्षण: गोणपट पडदे, फ्लेक्स कपडा, सुरक्षित शेकोटी, गरम पाणी, अतिरिक्त खुराक आणि कोरडी बसण्याची जागा उपलब्ध करणे.
  • 2. फुफ्फुसदाह/ठसकणे: कमी प्रतिकारशक्ती असलेल्या गोवंशासाठी वनस्पतीजन्य प्रतिजैवक (Ginger, Oregano, Thyme, Tea tree तेल) पशुवैद्यकाने वापरावेत.
  • 3. रात्री निरीक्षण: दर 4 तासांनी पाण्याची भांडी, गव्हाण, मलमूत्र, थंडीमुळे कुडकुडणारे गोवंश अशी सर्व तपासणी शांततेत करावी.
  • 4. हिरव्या चाऱ्याची लागवड: रब्बी हंगामासाठी हिरवा चारा मोठ्या प्रमाणात पेरणी करणे आवश्यक.
  • 5. माजाची लक्षणे: शरीर वजन योग्य असणाऱ्या गायी/कालवडींमध्ये हिवाळ्यात माजाची लक्षणे दिसतात — देशी पैदास करणे योग्य.
  • 6. प्रजनन ऋतू: माजावर येणाऱ्या गोवंशासाठी शुद्ध देशी गोवंशाचे रेत वापरूनच रेतन करावे.
  • 7. त्वचेची निगा: कास, शेपटीची आतील बाजू सुकल्यास नारळ तेल, निर्जंतुक व्हॅसलीन किंवा लोणी-हळद वापरावी.
  • 8. ओलाव्यापासून संरक्षण: गोवंश भिजू नये आणि गोठ्याबाहेर पाणी साठणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी.
  • 9. आहार वाढ: दैनंदिन आहारात किमान 10% वाढ करावी जेणेकरून शरीरातील तापमान संतुलित राहील.
  • 10. वाहतूक: अत्यावश्यक सोडल्यास हिवाळ्यात रात्री गोवंशाची वाहतूक टाळावी.
  • 11. निवारा/आच्छादन: जाड कपडे, फरशीवर रबरी चटई, काँक्रीटवर पुठ्ठे — पूर्ण बंदिस्त निवारा आवश्यक.
  • 12. तापमान नोंद: 5% गोवंशांचे तापमान, श्वास व नाडी दररोज तपासावी व नोंद करावी.
  • 13. थंड वारे: थंड हवेचे झोत असल्यास गोवंशाला मुक्त संचारासाठी बाहेर सोडू नये.
  • 14. नोंदी अद्यावत: सर्व माहिती व नोंदवह्या नियमित अद्यावत कराव्यात.
  • 15. प्रशिक्षण: गोआधारित नैसर्गिक शेती, नवीन गोमय उत्पादन निर्मिती व चर्चासत्रासाठी हा काळ सर्वोत्तम.
  • 16. गोपर्यटन/साहित्य: गो आधारित तांत्रिक साहित्य, वाचनालय, विक्री केंद्र यांसाठी नियोजन करावे.
  • 17. सन्मान नामांकन: महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मानासाठी नामांकन सादर करावे.
  • 18. हवामान पूर्वसूचना: हवामान बदलाची माहिती घेत सतर्क राहावे.
  • 19. आपत्ती व्यवस्थापन: पाऊस, चक्रीवादळ, हिमवृष्टीसाठी प्रतिबंधात्मक उपाय तयार ठेवावे.
  • 20. जनसहभाग: सर्व गोपालक, पशुवैद्यक, गोरक्ष यांच्या सूचना घेऊन सुधारणा कराव्यात.

संकलन व निर्मिती — डॉ. नितीन मार्कण्डेय (सदस्य, गोसेवा आयोग)

📰 बातम्या
  • No announcements available.
📋 महत्वाच्या सुचना
🔗 महत्वाच्या लिंक्स

माहिती कक्ष

— महाराष्ट्र गोसेवा आयोग

इतिहास आणि स्थापना
इतिहास आणि स्थापना
अधिक माहिती
योजना
उद्दिष्टे
अधिक माहिती
महाराष्ट्रातील मेंढ्या
महाराष्ट्रातील नोंदणीकृत गोशाळा
अधिक माहिती
पुरस्कार आणि मान्यता
शासकीय व अशासकीय यंत्रणा
अधिक माहिती
भगवान श्रीकृष्ण
गोपाष्टमीचा आनंद साजरा करा

गोपाष्टमीचा आनंद साजरा करा । भारतीय संस्कृतीत पहिला गोपालक म्हणजे गोविंद, तोच श्रीकृष्ण ...

लोकरी उत्पादने
चारा पिके डायरी
अधिक माहिती

महाराष्ट्र गोसेवा आयोगा बदल अधिक माहिती


आयोगाचे कार्यक्षेत्र
आयोगाचे कार्यक्षेत्र

महाराष्ट्रातील 34 जिल्हामधील नोंदणीकृत असलेल्या गोशाळा


अधिक माहिती
विविध योजना
आयोगाच्या विविध योजना

देशी गाईच्या परिपोषणासाठी प्रति दिन अनुदान योजना. सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना.

अधिक माहिती
संरचना
गोसेवा आयोगाची संरचना

संबंधित कायदे अंमलबजावणी: आयोग गोवंशाच्या हत्या विरोधी कायदे आणि त्यांच्या संरक्षणासाठी विविध कायदे व नियमांची अंमलबजावणी करतो.

अधिक माहिती
कार्यरचना
कार्यरचना

शासकीय सदस्य आणि अशासकीय सदस्य नावे व पद

अधिक माहिती

इतर माहिती