
महाराष्ट्र गोसेवा आयोगाची प्रशिक्षणे गोवंश संरक्षण, सेंद्रिय शेती, दुग्धव्यवसाय आणि पशुपालनाच्या विविध पैलूंवर आधारित आहेत. हे प्रशिक्षण शेतकऱ्यांना गोपालन, दूध उत्पादन, आणि पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञान शिकवते. यामध्ये आर्थिक साक्षरता, कृषी प्रक्रिया उद्योग, पशुधन व्यवस्थापन, आणि ग्रामीण विकासासह आत्मनिर्भरतेच्या मार्गदर्शनाचे शिक्षण दिले जाते.
शासन निर्णय क्र. पविआ-११२४/प्र.क्र. २२९/पदूम-३ दिनांक २४/०९/२०२४ उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्यामध्ये पशुंचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी, गोसेवा आयोग गठित करण्यात आलेला असून महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ अन्वये निर्देशित केलेले उद्देश सर्व गोशाळा ट्रस्टी व संचालकांपर्यन्त पोहोचवणे या उद्देशाने महाराष्ट्र मधील ३४ जिल्ह्यात जिल्हास्तरीय एक दिवशीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यास संदर्भ २ अन्वये शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. (प्रत संलग्न) सदर प्रशिक्षणा अंतर्गत गोशाळा स्थापनेचा उद्देश, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, गोशाळेतील गोवंशचे टॅगिंग, गोशाळा मधील पशुधनाचे आरोग्य व चारा व्यवस्थापन, गोशाळा गोपालन व संवर्धन, गोशाळा व्यवस्थापन, गोशाळा पंचगव्य उत्पादन, गोशाळा देशी गोवंश संवर्धन व रक्षण, गोशाळा स्वावलंबन, गोशाळातील शेती व्यवस्थापन, गोशाळा कार्यालय व्यवस्थापन, गोशाळा दानदाता संपर्क, सरकारी अधिकारी संपर्क, गोशाळेत आवश्यक कागदपत्रे व अभिलेखे, गोशाळा मधील विविध कार्यक्रम, उपक्रम, उत्सव व गोशाळा प्रचार प्रसार अश्या विविध विषयांवर प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात (प्रत्येक गोशाळा कमाल २ प्रतिनिधी प्रमाणे) गोशाळा ट्रस्टी व संचालकाचे एक दिवशीय प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे संदर्भात खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
| अ. क्र. | महिना | जिल्हयाची नावे |
|---|---|---|
| 1 | ऑक्टोबर 2024 | छ. संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली |
| 2 | नोव्हेंबर 2024 | लातूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली |
| 3 | डिसेंबर 2024 | अमरावती, अकोला, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया |
| 4 | जानेवारी 2025 | ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
| 5 | फेब्रुवारी 2025 | नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर |
| 6 | मार्च 2025 | पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर |

ऑक्टोबर 2024 |

नोव्हेंबर 2024 |

डिसेंबर 2024 |
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्यामध्ये पशुंचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी, गोसेवा आयोग गठित करण्यात आलेला असून महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ अन्वये निर्देशित केलेले उद्देश सर्व गोपालन करणारे पशुपालकापर्यन्त पोहोचवणे या उद्देशाने एकूण २२० तालुक्यांमध्ये प्रती तालुका ५० प्रमाणे तालुक्यातील पशुपालक, गोशाळा, महिला बचत गटातील सदस्य, फार्मा प्रॉड्यूसर कंपनी तसेच स्थानीय गोपालन करणारे शेतकरी व पशुपालक यांचे एक दिवशीय प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबत संदर्भ- ३ अन्वये शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. (प्रत संलग्न) सदर प्रशिक्षणा अंतर्गत गोशाळा स्थापनेचा उद्देश, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, गोशाळेतील गोवंशचे टॅगिंग, गोशाळा मधील पशुधनाचे आरोग्य व चारा व्यवस्थापन, गोशाळा गोपालन व संवर्धन, गोशाळा व्यवस्थापन, गोशाळा पंचगव्य उत्पादन, गोशाळा देशी गोवंश संवर्धन व रक्षण, गोशाळा स्वावलंबन, गोशाळातील शेती व्यवस्थापन, गोशाळा कार्यालय व्यवस्थापन, गोशाळा दानदाता संपर्क, सरकारी अधिकारी संपर्क, गोशाळेत आवश्यक कागदपत्रे व अभिलेखे, गोशाळा मधील विविध कार्यक्रम, उपक्रम,, उत्सव व 1 2 गोशाळा प्रचार प्रसार अश्या विविध विषयांवर प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने सोबत जोडेलेल्या यादीनुसार एकूण २२० तालुक्यांतील सर्वाधिक गोधन व सर्व सुविधा असणाऱ्या गोशाळा, पांजरपोळ, महिला बचत गटातील महिला, फार्मर प्रोड्युसर कंपनी चे शेअर होल्डर, व स्थानीय गोपालन करणारे शेतकरी व पशुपालक यांना एक दिवशीय तालुकास्तरीय प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे संदर्भात खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
| अ.क्र. | महिना | जिल्हानिहाय तालुक्यांची संख्या (नावांची यादी सोबत जोडली आहे) |
|---|---|---|
| 1 | ऑक्टोबर 2024 | पुणे (१५ तालुके), सातारा (१० तालुके), सांगली (१० तालुके) - एकूण तालुके ३५ |
| 2 | नोव्हेंबर 2024 | सोलापूर (१० तालुके), कोल्हापूर (११ तालुके), नागपूर (१० तालुके), भंडारा (६ तालुके) - एकूण तालुके ३७ |
| 3 | डिसेंबर 2024 | चंद्रपूर (६ तालुके), गडचिरोली (३ तालुके), गोंदिया (७ तालुके), वर्धा (६ तालुके), नाशिक (१४ तालुके) - एकूण तालुके ३६ |
| 4 | जानेवारी 2025 | अमरावती (१४ तालुके), अकोला (६ तालुके), बुलढाणा (१२ तालुके), वाशिम (५ तालुके) - एकूण तालुके ३७ |
| 5 | फेब्रुवारी 2025 | यवतमाळ (१४ तालुके), छ. संभाजीनगर (८ तालुके), जालना (७ तालुके), बीड (९ तालुके), धाराशिव (८ तालुके) - एकूण तालुके ४६ |
| 6 | मार्च 2025 | हिंगोली (४ तालुके), लातूर (६ तालुके), परभणी (५ तालुके), नांदेड (१४ तालुके) - एकूण तालुके २९ |

ऑक्टोबर 2024 |

नोव्हेंबर 2024 |

डिसेंबर 2024 |